संत गोमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘छोड दिया वैकुंठ, हरि भावभगत का भूखा’ या संत कबीरांच्या शब्दांचा प्रत्यय पंच्या वाटेवर चालताना प्रत्येक भक्ताला येतो. वृद्ध संत गोमाईसुद्धा त्याला अपवाद नव्हत्या. मनामध्ये केवळ पांडुरंग भेटीची आस धरून मजल दरमजल करत पंचालत निघालेल्या वृद्ध संत गोमाईची तहानभूक हरपून गेली होती. आपल्या जातीची भीती मनात बाळगून, विठ्ठलाचे लांबून दर्शन झाले तरी वारीचे सार्थक झाले ही भावना मनात होती. ही आषावारी करीत असताना चंद्रभागा पाण्याने फुगलेली दिसली. चहूकडे वादळी पावसाने थैमान घातले होते. चंद्रभागेच्या तीरी अंधारात बसून वापाणी त्या पाहात होत्या. यावर्षी पुरामुळे पांडुरंगाच्या कळसाचेही दर्शन होणार नाही ही भावना त्यांना दुःख देत होती. तेवय़ात समोरून एक नाव आली आणि संत गोमाईंना राऊळात जाता आले. स्वयंभू विठ्ठलच त्यांना न्यायला आला होता अशी याबाबत कथा सांगितली जाते. भक्तासाठी व्याकुळ झालेल्या पांडुरंगाने गोमाईंना साक्षात दर्शन दिले. आपले संपूर्ण जीवन पांडुरंगाच्या सेवेसाठी वेचणाऱया संत गोमाई पांडुरंगाच्या लाडक्या भक्त होत्या.