
अन्न नियामक संस्था फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएयआय) दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोटे दावे आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही प्रमुख बँड्ससह अन्न कंपन्यांना 150 हून अधिक नोटीस बजावल्या आहेत. एफएसएसएयआयने कारवाई करण्यात आलेल्या काही प्रमुख ब्रँड्सची यादीदेखील जाहीर केली आहे. यामध्ये नेस्ले इंडिया, पेप्सिको, ऍबॉट इंडिया लिमिटेड, रेड बुल इंडिया, डॅनन इंडिया, मॉन्स्टर एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हेल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, मोंडेलीझ इंडिया, कोका-कोला इंडिया, डियाजिओ, पेरनोड रिकार्ड, फेरेरो इंडिया आणि केनह्यू इंक यांचा समावेश आहे.


























































