
1 बिहारमध्ये बीपीएससी टीआरई-4 पीटी मेन्स परीक्षेतील निगेटिव्ह मार्ंकग हटवणे आणि 100 टक्के डोमिसाईलच्या मागणीवरून विद्यार्थ्यांचे पाटण्यात आंदोलन सुरूच आहे. हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत मंगळवारी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
2 विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी जेपी गोलंबरवर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती. सीआरपीएफ जवानांनाही रस्त्यावर उतरवले होते, परंतु विद्यार्थी जेपी गोलंबरवर लावलेले बॅरिकेडिंग हटवून डाकबंगला पोहोचले.
3 दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. आता डाकबंगला येथे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा केला. यात एका विद्यार्थ्याचे डोके फुटले. एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली.
4 पोलिसांकडून करण्यात आलेल्या पाण्याच्या माऱयात विद्यार्थ्यांनी
शॅम्पू लावून अंघोळ केल्याचेही दिसले. काही ठिकाणी पोलिसांनी विद्यार्थ्यांना फरफटत नेले. आंदोलन ठिकाणी बंकर गाडी बोलावली होती. ही गाडी नक्षलग्रस्त भागात असते































































