Jammu Kashmir – अनंतनाग येथे डोंगरावरून दगड कारवर कोसळला, एका पर्यटकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मट्टन परिसरात डोंगरावरून घरंगळत आलेला दगड कारवर कोसळला. यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे डोंगरावरील दगड सैल होऊन हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारचालकासह अन्य प्रवाशी सुखरुप बचावले आहेत.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, केपी रोडवरील बुमजू मट्टन येथे ही घटना घडली. ही कार बारामुल्ला येथील पट्टनचे रहिवासी आरिफ दिलावर खान चालवत होते. या कारमध्ये ओडिशातील सहा पर्यटकांसह चालक होता. सर्व पर्यटक पहलगामहून अनंतनागला जात असतानाच बुमजू मट्टनजवळ त्यांच्या कारवर दगड कोसळला.

दुर्घटनेत 55 वर्षीय ओडिशाचे पर्यटक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.