
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटीवरुन विद्यार्थ्यांसह विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या पेपरफुटीविरोधात पुण्यात आज विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढलाय. हा मोर्चा शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी या मोर्चात सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
फोटो – चंद्रकांत पालकर





























































