स्वामी समर्थांच्या चांदीच्या पादुका चोरणाऱ्या दोघांना पुण्यात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खालापूरमधील स्वामी समर्थ मठातील चांदीच्या पादुका चोरून पसार झालेल्या सराईत चोरट्यांच्या खालापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रवी सोनी, महेंद्रसिंग राठो अशी अटक आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना पुण्यातून अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत नवीन खालापूर प्रशासकीय भवना शेजारी असलेल्या स्वामी समर्थ मठातील चांदीच्या पादुका दोन चोरट्यांनी चोरून नेल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या तपासात चोरटे पुण्यात लपून बसल्याचे समोर आले. खालापूर पोलीस पथकाने पुण्यात जाऊन सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.