
सोशल मीडियावर सध्या रेट्रो लुकची जादू चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. इंस्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा नवीन ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. या ट्रेंडमध्ये आपण स्वतःचे फोटो 1980 च्या दशकातील लुकमध्ये बदलू शकतो. अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही हा AI ट्रेंड ट्राय केला आहे. तसेच, सर्वसामान्य युजर्सही यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. विचार करा, तुमचा आवडता फोटो आजच्या काळाऐवजी 1980 मध्ये काढला गेला असता, तर तो कसा दिसला असता? याच प्रश्नाने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेकजन आपले मॉडर्न सेल्फी आणि फोटो ChatGPT च्या मदतीने व्हिंटेज पोर्ट्रेट्स, जुन्या फॅमिली अल्बममधील फोटो आणि क्लासिक बॉलीवूड स्टाइलमध्ये बदलत आहेत. हा ट्रेंड केवळ फोटोंवर जुन्या काळातील फिल्टर लावण्यापुरता मर्यादित नाही. ChatGPT च्या मदतीने युजर्स आपले फोटो नव्याने तयार करत आहेत. यामध्ये पोशाख, हेअरस्टाइल, दागिने, बॅकग्राउंड आणि अगदी कॅमेऱ्याचे खास इफेक्ट्ससुद्धा 1980 च्या दशकानुसार बदलले जाऊ शकत आहेत.
तुमचा फोटो रेट्रो कसा बनवाल?
- सर्वात आधी ChatGPT वर तुमचा फोटो अपलोड करा.
- तुम्हाला तो फोटो 1980 च्या दशकातील लुकमध्ये हवा आहे, असे स्पष्ट सांगा.
- यानंतर तुमचे कपडे, हेअरस्टाइल, दागिने आणि बॅकग्राउंडबद्दल सविस्तर माहिती द्या.
- तसेच AI ला निर्देश द्या की त्याने तुमच्या चेहऱ्यामध्ये कोणताही बदल करू नये, जेणेकरून फोटोतील व्यक्ती तुम्हीच आहात हे ओळखता येईल.
- काही सेकंदांच्या प्रतीक्षेनंतर तुमचा आवडता फोटो तयार होईल आणि तो तुम्ही इंस्टाग्रामवर शेअर करू शकता.
काही लोकप्रिय प्रॉम्प्ट्स (Prompts) जे तुम्ही वापरू शकता
- क्लासिक बॉलीवूड पोर्ट्रेटसाठी ChatGPT ला सांगताना लिहा की, हा फोटो 1980 च्या दशकातील बॉलीवूड स्टुडिओ पोर्ट्रेटसारखा रिअलिस्टिक बनव. तसेच माझ्या चेहऱ्यात कोणताही बदल करू नको.
- ओल्ड फॅमिली अल्बमसाठी असे लिहा की, हा फोटो असा बनव की जणू तो 1980 च्या दशकाच्या मध्यातील एखाद्या भारतीय कौटुंबिक अल्बममधील फोटो आहे.
- दूरदर्शन युगातील फोटोसाठी लिहा की, हा फोटो असा तयार कर जणू तो 1980 च्या दशकातील एखाद्या भारतीय टेलिव्हिजन कार्यक्रमासाठी काढण्यात आला आहे.
























































