
बोलघेवडय़ा भाजप सरकारच्या निक्रिय कारभाराचा पंचनामा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘तुमसे ना हो पायेगा’ हे जनआंदोलन करण्यात येत आहे. नांदेड येथे शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असून त्याला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
नांदेड जिल्हय़ाच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा, अपूर्ण प्रकल्प, निधीअभावी रखडलेल्या विकास योजना या सर्वांचा पंचनामा 11 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनात करण्यात येणार आहे. यावेळी संजय राऊत यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता होणाऱ्या या आंदोलनात संपर्कप्रमुख बबनराक थोरात, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख बबनराक बारसे, भुजंग पाटील, ज्योतिबा खराटे यांच्यासह शेकडो शिवसैनिक, सामान्य नागरिक, शेतकरी सहभागी होणार आहेत.
































































