
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या ताज्या फोटोंमध्ये तिचा अत्यंत आकर्षक, पारंपारिक आणि ट्रेंडी एथनिक लूक पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये तिने लाईम ग्रीन शेडमधील सिल्क साडी नेसली असून त्यावर बारीक बुटीचे नक्षीकाम आहे. या साडीवर तिने मॅचिंग एम्ब्रॉयडरी अन् कटवर्क डिझाईन असलेला स्लीव्हलेस व्ही-नेक ब्लाउज परिधान करून लूकला मॉडर्न टच दिला आहे. या एथनिक लूकची शोभा वाढवण्यासाठी तिने हेवी ट्रेडिशनल मीनाकारी स्टेटमेन्ट झुमके आणि त्याला मॅचिंग असे रॉयल ब्लू मीनाकारी वर्क व मोत्यांची किनार असलेले ब्रॉड कडे घातले आहे. चेहऱ्याभोवती काही लटा मोकळ्या सोडून मागे बांधलेला सॉफ्ट मेसी बन, मिनिमल न्यूड मेक-अप, सॉफ्ट ब्राऊन आयशॅडो, न्यूड पिंक लिपस्टिक आणि कपाळावर लावलेली छोटीशी नाजूक टिकली तिच्या या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.





























































