
‘पंडया स्टोअर’ आणि ‘सैराब’ यासारख्या शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता रोहित चंदेल याला दोन महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे. 16 वर्षांच्या मुलीचा पाठलाग करणे, वारंवार फोन करणे, त्रास देणे आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी त्याला जुलैमध्ये अटक केली होती. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असून तो गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे. रोहित चंदेलला यापूर्वी जामीन मिळण्यात अडचणी आल्या होत्या. चार्जशीटमध्ये धर्मही चुकीचा नोंदवला गेला होता. वैद्यकीय नोंदींमध्येही चूक होती.


























































