
शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर आणि परिसरात सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्याबाबतच्या संस्थानच्या पत्रानुसार 8 आठवडय़ांत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्या. किशोर संत आणि न्या. जितेंद्र जैन यांनी शुक्रवारी सीआयएसएफचे डायरेक्टर जनरल यांना दिले.
संस्थानच्या बैठकीत सीआयएसएफची सुरक्षा लागू करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने कुठलीही कारवाई न झाल्यामुळे संजय काळे यांनी याचिका दाखल केली आहे.


























































