वेलचीचा वापर फक्त माउथ फ्रेशनर म्हणून नाही तर… जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिरवी वेलची ही हिंदुस्थानी मसाल्यांच्या डब्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. तिच्या उत्कृष्ट सुगंधामुळे तिचा वापर केवळ मसालेदार पदार्थांमध्येच नाही, तर मिठाई आणि इतर गोड पदार्थांमध्येही केला जातो. वेलची हा केवळ एक मसाला नाही, तर ती अनेक शक्तिशाली गुणधर्मांनी समृद्ध आहे. हिरव्या वेलचीमध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न (लोह), फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. अनेक लोक मुखशुद्धीसाठीही वेलची चघळतात, परंतु याचे फायदे फक्त तेवढेच मर्यादित नाहीत. वेलची आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकते. याबद्दल जाणून घेऊया.

पचनक्रिया सुधारते
वेलचीमधील एशेंशियल ऑइल्स पोटात गॅस्ट्रिक ज्यूस आणि पाचक एंझाईम्सचे निर्मितीला चालना देते.. यामुळे ॲसिडिटी, पोट फुगणे आणि गॅसची समस्या कमी होऊ शकते. यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि अन्न सहजरित्या पचण्यास मदत होते.

तोंडाचे आरोग्य सुधारते
वेलची ही माउथ फ्रेशनर असण्यासोबतच ओरल हेल्थ वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. यामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे जीवाणूंची वाढ रोखतात आणि तोंडाची दुर्गंधी दूर करतात. याचसोबत हिरड्यांचे इन्फेक्शन आणि दातांमधील कॅव्हिटीपासून बचाव होतो.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते
वेलचीचा आणखी एक फायदा म्हणजे ती हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास मदत करते, म्हणजेच हृदय निरोगी ठेवण्यास साहाय्य करते.

रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त
हिरव्या वेलचीमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आणि मूत्रवर्धक गुणधर्म आहेत, जे रक्तवाहिन्या शिथिल करून रक्ताभिसरण सुधारतात आणि उच्च रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करू शकतात.