Ratnagiri News – देवरुखमध्ये ६ फुटी अजगराचा थरार; ‘फायटर’ कोंबड्याची शिकार करताना पकडले, हेल्प फोर्सच्या रक्षकांची धाडसी कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवरुख येथील खालची आळी परिसरातील रहिवासी निखिल मिरजकर यांच्या घरी आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका भलामोठ्या अजगराने दर्शन दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुमारे ६ फूट लांबीच्या या अजगराने घरातील ‘फायटर’ कोंबड्याची शिकार केली होती.

​घटनेची माहिती मिळताच ‘हेल्प फोर्स’ चे सर्परक्षक आर्य बेर्डे आणि ओम बेर्डे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पहाटेच्या अंधारात आणि प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कौशल्याने व धैर्याने त्यांनी या ६ फुटी अजगराला सुरक्षितपणे पकडले.

​सर्परक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसाबद्दल मिरजकर कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी आर्य व ओम बेर्डे यांचे मनापासून आभार मानले आहेत. पकडलेल्या अजगराला वनविभागाच्या सूचनेनुसार सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.