सौदीकडे जाणारी इंडिगोची उड्डाणे रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येमेनमधील हुती बंडखोर आणि सौदी अरब यांच्यातील संघर्ष अधिक टोकाला पोहोचला आहे. त्यामुळे हवाई क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने इंडिगो एअरलाइनने सौदी अरबकडे जाणारी आणि तेथून हिंदुस्थानात येणारी सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, रियाध येथे जाणारी आणि तेथून येणारी सर्व उड्डाणे ही 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत, तर जेद्दा, दम्माम आणि मदिना या तीन शहरांसाठी ये-जा करणारी उड्डाणे 27 ऑक्टोबरपर्यंत रद्द राहणार आहेत. सुरक्षेच्या परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यानंतर उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे. इंडिगोने घेतलेल्या या निर्णयाचा प्रवाशांना आणि त्यांच्या बुकिंगसंबंधी माहिती दिली जात आहे.