
‘एसआयआर’नंतर काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. अंतिम मतदार यादीत एपूण 4.55 कोटी मतदारांची नावे असून 99.32 लाख मतदारांची नावे कापण्यात आली आहेत. आयोगाने ‘एसआयआर’नंतर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत 1.08 कोटी मतदारांची नावे कमी होती. दावे आणि हरकतींचा निपटारा केल्यानंतर अंतिम यादीत 8.64 लाख मतदारांची नावे जोडण्यात आली. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अपील करता येईल.




























































