
मीरा-भाईंदर शहरात बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षाचालकांचे बॅच आणि परमिट मिळवण्याचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत 80 ते 90 रिक्षाचालकांचे बॅच परवाने रद्द केले असून कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आणखी परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मीरा-भाईंदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी प्रसाद नलावडे यांनी दिली आहे.



























































