
ठाण्यातील मानपाड्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांचे पुत्र राम पुर्णेकर यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री ठाण्यात आलेले असताना राम पूर्णेकर यांनी त्यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. दरम्यान ही भेट होऊ नये यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप राम पुर्णेकर यांनी केला आहे.
”आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो व मुख्यमंत्र्यांकडे माझ्या भावना मांडल्या आहेत. मला न्यायाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी माझे बोलणे ऐकून घेत आश्वासन दिले आहे”, असे राम पुर्णेकर यांनी सांगितले. तसेच ”मी मुख्यमत्र्यांना भेटू नये यासाठी माझ्यावर दबाव होता. त्यामुळे मी रात्रभर फोन स्विच ऑफ ठेवला होता”, असेही त्यांनी सांगितले.
ठाण्यातील मानपाड्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडातील खरे मास्टरमाईंड शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे आहेत, असा आरोप पूर्णेकर यांनी केला आहे





























































