ओठ फुटलेत, हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळ्यात ओठ फुटणे ही एक सामान्य समस्या आहे. कोरडी हवा, डिहायड्रेशन किंवा थंडीमुळे ओठ फुटतात.

ओठांवर पेट्रोलियम जेली (व्हॅसलीन), शिया बटर किंवा खोबरेल तेल लावा.

शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) होऊ देऊ नका, दिवसभरात पुरेसे पाणी प्या.

ओठ कोरडे वाटल्यास त्यांना जिभेने बारबार चाटू नका, यामुळे ओठ आणखी जास्त फुटतात.

ओठांवरची निघणारी मृत त्वचा किंवा पापुद्रे हाताने किंवा दाताने ओढू नका.