
देशाची जनगणना 25 जानेवारी 2027पासून सुरू होणार आहे. यासाठी हिंदुस्थानात आतापर्यंतचे सर्वात मोठे डिजिटल मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. देशभरातील 24.25 लाख हाऊसलिस्टिंग ब्लॉक्सचे डिजिटल मॅपिंग करून ते सॉफ्टवरमध्ये जोडण्यात आले आहे. यासंदर्भात देशाचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी माहिती दिली.
जनगणना पुढील वर्षी 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. विविध टप्प्यांमध्ये जनगणनेचे काम होणार आहे. त्यासाठी देशाभरात लहान ब्लॉकमध्ये विभागणी करून लोकसंख्या मोजली जाते. एका ब्लॉकमध्ये 150 ते 200 घरे आणि 800 लोक समाविष्ट केले जातात. एका ब्लॉकमधील गणनेची जबाबदारी एका कर्मचाऱयावर असते. म्हणजे, एक कर्मचारी 800 लोकांची गणना करेल.


























































