
आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले आधार कार्ड आणि जन्म दाखले उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील सर्व आदिवासी जिह्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात यावी, राज्यातील 16 आदिवासी जिह्यांना स्वतंत्र आधार नोंदणी संच उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी दिले. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आदिवासी संघटनांनी पुढाकार घेऊन आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करावी, जनसभा आयोजित कराव्यात आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन बावनपुळे यांनी केले.



























































