फटाक्यांच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होते! भागवतांची आतषबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीच्या काळातील प्रदूषणाविरोधात देशभर ओरड होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगळाच तर्क मांडला आहे. ‘फटाक्यांच्या धुरामुळे किटाणू मारले जातात आणि वातावरण शुद्ध होते. एकेकाळी असे व्हायचे. त्यामागे विज्ञान आहे,’ अशी आतषबाजी भागवत यांनी केली आहे. ‘प्राचीन काळात फटाके केमिकलमिश्रित नसायचे. त्या काळी वेगळय़ा प्रकारचे फटाके होते. त्यातून जो धूर यायचा त्यामुळे वातावरण शुद्ध व्हायचे. यामागचे विज्ञान समजून आपण उत्सव साजरे केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

उत्सवामुळे समाजात चैतन्य येते. उत्सव हे हिंदुस्थानी समाजाचा अविभाज्य भाग आहेत. अनादी काळापासून ते चालत आले आहेत. कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत. यापुढेही चालत राहतील.