मणिपूरमध्ये गोळीबार, महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरच्या ताफु या कुकीबहुल गावात आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. याशिवाय सिनाकेईथेल या भागातही गोळीबार झाला. मात्र, या ठिकाणी कोणतीही प्राणहानी झाली नाही. ताफु गावात सकाळी 11 वाजता गोळीबार झाला. त्यात किमनेइनेंग चोंगलोई या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला शेतात काम करत होती. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.