
भाजप नेत्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आपला निर्णय ही एक ‘चूक’ होती, अशी जाहीर कबुली देत त्यांनी पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे केरळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पद्मजा वेणुगोपाल या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत के. करुणाकरन यांच्या कन्या आहेत. काँग्रेससोबतचे जुने नाते तोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांनी आपल्या त्या निर्णयावर पश्चात्ताप व्यक्त करत भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल आणि त्या पुन्हा घरवापसी करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
























































