‘गोल्ड स्पॉट’ पुन्हा बाजारात येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्वदच्या दशकात तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले ऑरेंज फ्लेव्हरचे शीतपेय ‘गोल्ड स्पॉट’ तब्बल २६ वर्षांनंतर पुन्हा बाजारात आणण्याच्या तयारीत कोका-कोला असल्याचे वृत्त आहे. १९९३ मध्ये कोका-कोलाने पार्ले बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांच्याकडून गोल्ड स्पॉट, थम्स अप आणि लिम्का ही शीतपेयांची ब्रँड्स विकत घेतली होती. त्यानंतर फँटाला बाजारपेठेत स्थान देण्यासाठी गोल्ड स्पॉटचे उत्पादन बंद करण्यात आले होते. आता शीतपेयांच्या बाजारपेठेत वाढती स्पर्धा आणि शुगर-फ्री उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता गोल्ड स्पॉट नव्या स्वरूपात परतण्याची चर्चा आहे.