जेन्सन हुआंग पुन्हा एनव्हिडीयाच्या प्रमुखपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका सरकारच्या मध्यस्थीनंतर प्रख्यात उद्योगपती जेन्सन हुआंग यांची पुन्हा एनव्हिडीयाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही तेच काम पाहणार आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने आज ही घोषणा करताच कंपनीचे शेअर तब्बल ३१ टक्क्यांनी वधारले आहेत.

चीनच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून अनेक महत्त्वाची गुपिते फोडल्याच्या संशयानंतर हुआंग यांना कंपनीच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर एनव्हिडीयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हुआंग यांची चौकशी सुरूच राहणार आहे. ही चौकशी सुरू असतानाच कंपनीच्या संचालक मंडळाने हुआंग यांना परत आणण्याचा निर्णय घेतला. प्रदीर्घ चर्चा आणि बैठकांच्या फेऱ्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला.