म्हसळा बायपासवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरालगत असलेल्या बायपास रोडवर गौळवाडीजवळ रविवारी सायंकाळी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता एवढी होती की, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाड येथील बिर्ला ओपस कंपनीतील चारजण श्रीवर्धन-हरिहरेश्वर येथे फिरण्यासाठी आले होते. बायपासवरील गौळवाडीजवळच्या धोकादायक वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव कार रस्त्यालगतच्या खड्यात कोसळली. या अपघातात साईराज भोसले आणि मनन पांचाळ यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मागील महिन्यात याच ठिकाणी तीन अपघात झाले होते. त्यामुळे हे वळण वाहनचाल कांसाठी धोकादायक ठरत असून तत्काळ संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.