१५ व्या वित्त आयोगा आराखडा न बनवता रेटण्याचा प्रयत्न, शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत १५ व्या वित्त आयोगाचा आराखडा समोर न ठेवताच २०२३-२४,२०२४-२५ आणि २०२५-२६ च्या तीन वर्षांच्या फक्त मंजुरी देण्यात आली त्यामुळे शासन निर्णयाचे पालन झाले नाही. तसेच आराखड्यात कोणती कामे घेणार हे न सांगताच जिल्हा परिषद अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ व्या वित्त आयोगाचे आराखडे न बनवता कामे रेटून नेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मनमानी कारभाराचा त्यांनी पाढा वाचला आहे.

जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव हे यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या आराखडा सत्ताधारी पक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना विश्वासात न घेता रेटून नेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आणले आहे. विक्रांत जाधव यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना दिलेल्या पत्रात ३० जून २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत १५ व्या वित्त आयोगाचा आराखडा समोर न ठेवताच २०२३-२४,२०२४-२५ आणि २०२५-२६ च्या तीन वर्षांच्या फक्त मंजुरी देण्यात आली त्यामुळे शासन निर्णयाचे पालन झाले नाही. तसेच आराखड्यात कोणती कामे घेणार हे न सांगताच जिल्हा परिषद अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ व्या वित्त आयोगाचे आराखडे न बनवता कामे रेटून नेण्याचा प्रयत्न केला. या चुकीच्या कामकाजाबाबत आम्ही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर यासंदर्भात लक्ष घालून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य ती कारवाई करण्यास सांगितले मात्र त्याविषयी अद्याप आम्हाला सभागृहात उत्तर मिळालेले नाही. विरोधी पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार केली आहे. १ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तात परिशिष्ट ६ आढळून येत नाही हि बाब हि विक्रांत जाधव यांनी निदर्शनास आणून दिली आहे. पंचायत समिती खेड मध्येही विरोधी पक्षाच्या सदस्यांना १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळत नसल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली तरीही अद्याप आम्हाला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये समन्वय,समतोल आणि समान न्याय देण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अपयशी ठरत आहेत अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

१५ दिवसात आयुक्तांनी अहवाल मागवला

शिवसेना जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांच्या तक्रारीची दखल घेत कोकण विभागीय अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे यांनी विक्रांत जाधव यांनी केलेल्या सर्व तक्रारींची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करून त्याचा अहवाल १५ दिवसात सादर करण्याचा आदेश रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला आहे,