
‘अहिंसा हे तत्त्व म्हणून उत्तम आहे. वाघ अहिंसक झाला असे आपण ऐकतोही, पण तो त्याचा विकास नाही. वाघ आणि बकरी एकत्र जेवतात हा त्यांनी केलेला तमाशा असतो. सर्पशीमध्ये ते ठीक वाटते. प्रत्यक्षात वाघाचा विकास जंगलाचा राजा बनून राहण्यात असतो. तीच विकासाची खरी व्याख्या आहे. 2047 ला असाच विकसित भारत आपल्याला हवा आहे,’ अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पद्म उत्सवात भागवत यांनी विकास आणि ‘विकसित भारत’ घोषणेवर भाष्य केले. ‘2047 पर्यंत विकसित भारत असे म्हणण्यामागे कारण आहे. ही आपण घातलेली मर्यादा आहे. एखाद्या गोष्टीला कालमर्यादा घातली की त्याची तातडी लक्षात येते,’ असे ते म्हणाले.





























































