एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड, प्रकल्पाची निविदा प्रक्रिया वादात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रकल्पाची निविदा प्रक्रिया चौकशीच्या कचाटय़ात सापडली आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीपासून राबविलेल्या सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियेची माहिती तसेच संबंधित कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या उपाध्यर्क्षाना दिले आहेत.

एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रकल्पाची अंमलबजावणी, निविदा प्रक्रिया आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या निवडीबाबत प्रसारमाध्यमांमधून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया नेमकी कोणत्या पद्धतीने राबविण्यात आली, कोणते प्रशासकीय व तांत्रिक निकष निश्चित केले होते, निविदा प्रसिद्धीपासून अंतिम कंत्राट मंजुरीपर्यंत कोणकोणते टप्पे पार पडले आणि संबंधित कंपनीची निवड कोणत्या आधारावर करण्यात आली, याची संपूर्ण माहिती परिवहन मंत्र्यांनी मागवली आहे. संबंधित माहिती कोणतीही दिरंगाई न करता संकलित करून स्पष्ट अभिप्रायासह अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देशही दिले आहेत.