
देशामध्ये डिजिटल व्यवहारांचा बोलबाला सुरू असताना कॅशचा वापरही तितकाच वाढला आहे. ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांनी एटीएममध्ये जाऊन तब्बल 40 हजार 492 कोटी रुपये काढले आहेत. हा खर्च डेबिट कार्डच्या तुलनेत जवळपास सहा पट अधिक आहे.
आरबीआयच्या मासिक आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 2.45 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. तर डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदीसाठी झालेला खर्च तब्बल 40,492 कोटी रुपये इतका होता. क्रेडिट कार्डच्या वापरात ऑनलाइन व्यवहारांचा मोठा वाटा होता. ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन माध्यमातून क्रेडिट कार्डद्वारे 1.54 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. प्रत्यक्ष दुकानांमधील पीओएस यंत्रांवरून 90,562 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली. अन्य व्यवहारांचे मूल्य 119 कोटी रुपये होते. दुसरीकडे, डेबिट कार्डचा वापर प्रामुख्याने प्रत्यक्ष खरेदीसाठी झाल्याचे दिसते. पीओएस यंत्रांद्वारे 24,957 कोटी रुपयांचे व्यवहार झाले, तर ऑनलाइन खरेदीसाठी 15,284 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
ऑक्टोबरमध्ये डेबिट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून 42.04 कोटी व्यवहारांद्वारे 2.32 लाख कोटी रुपयांहून अधिक रोकड काढण्यात आली. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून काढण्यात आलेली रोकड 415 कोटी रुपये होती. डेबिट कार्ड वापरून पीओएस यंत्रांद्वारे काढण्यात आलेली रोकड सुमारे 1.27 कोटी रुपये होती.

























































