
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना अनपेक्षित धक्का शुक्रवारी बसला. मुंबई इंडियन्सने आपली प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत रोहित शर्माला संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्त केले आहे. हार्दिक पंडय़ाला संघाबाहेर केल्यावर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचे नाव कर्णधारपदासाठी चर्चेत होते. पण मुंबई इंडियन्सने चाहत्यांना सुखद धक्का देत रोहितच्या गळय़ात कर्णधारपदाची माळ घातली आहे. त्यामुळे आयपीएल 2027 मध्ये रोहित संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसेल.
लिलावापूर्वीच का केली घोषणा
आयपीएलचा मिनी लिलाव 16 डिसेंबरला रंगणार आहे. पण त्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने रोहितच्या हाती संघाचे नेतृत्व सुपूर्द केले. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. रोहितला आता संघाची बांधणी करावी लागेल. त्यामुळे लिलावात आपल्याला कोणते खेळाडू घ्यायचे आहे, हे तो ठरवू शकतो.
यशस्वी कर्णधारावर विश्वास ठेवला
गेल्या काही हंगामात मुंबई इंडियन्सला चॅम्पियन संघासारखा खेळ करता आला नव्हता. त्यामुळे आता मुंबईने आपल्या सर्वात यशस्वी कर्णधारावर विश्वास ठेवला आहे. रोहितने 2013 ते 2023 या सलग 11 हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सला पाच सलग विजेतेपदे (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) मिळवून दिली, ज्यामुळे तो महेंद्रसिंग धोनीसोबत आयपीएलच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा कर्णधार ठरला आहे. पण सर्वप्रथम पाच जेतेपदं पटकावण्याचा मान हा रोहितने पटकावला होता.
रोहित शर्मा काय म्हणाला?
‘मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग राहिली आहे आणि या संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आगामी हंगामाबद्दल नीता वहिनी आणि आकाश यांच्यासोबत झालेल्या चर्चा रोमांचक होत्या आणि आम्ही काय साध्य करू शकतो याबद्दल मला विश्वास आहे. मी 20 व्या हंगामाची, पुढील आव्हानांची आणि माझ्या संघासाठी आनंद साजरा करण्याच्या अनेक संधींची आतुरतेने वाट पाहत आहे. आमचे लक्ष आमच्या शैलीत क्रिकेट खेळण्यावर, एकत्र स्पर्धा करण्यावर आणि खेळाचा आनंद लुटण्यावर असेल,’ अशी भावना रोहित शर्माने कर्णधारपद मिळाल्यावर व्यक्त केली.
























































