सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील माटुंगा भागात किंग सर्कलजवळ बेस्ट बसला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी घडली. वाहकाच्या केबिनमध्ये लागलेली आग काही वेळात संपूर्ण बसमध्ये पसरली. या आगीत वाहकासह प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
दुपारच्या सुमारास बस किंग सर्कलजवळ आल्यानंतर बस वाहक सत्तू फर्नांडिज यांना बस इंजिनमधून धूर येत असल्याचे दिसले आणि त्यांनी कंडक्टर राजेंद्र चौहान व प्रवाशांना सतर्क केले. त्यानंतर सर्व प्रवाशांना बस खाली करा असे सांगण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी बसमध्ये 20 ते 25 यात्री प्रवास करत होते. या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने ने तात्काळ धाव घेऊन बसला लागलेली आग विझवली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. या आगीमध्ये बस संपूर्ण जळून खाक झाल्याने बसचा केवळ सांगाडा उरला.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना बेस्टच्या प्रवक्त्यांनी हा घटनेची वरळी डेपो आणि बेस्ट प्रशासनाकडून चौकशी करण्यात येईल असे म्हटले आहे.
#Mumbai: A BEST bus caught fire at King’s Circle in Matunga, today; No casualties reported, fire is under control now. pic.twitter.com/9kYnGKBGIs
— ANI (@ANI) July 31, 2019



























































