
भिवंडी येथून निलंगा तालुक्यातील मौजे धानोरा येथे मामाच्या गावी आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी येथून विशाल जितेंद्र बिराजदार हा मुलगा धानोरा येथे आपल्या मामाच्या गावी आला होता. त्याचा मामा रामचंद्र जाधव यांच्या शेतात इलेक्ट्रीकची वायर तुटून पडलेली होती. त्याचा स्पर्श होऊन विशाल हा 60 टक्के भाजला होता.
त्याच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आज त्याच्या पार्थिवावर धानोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

























































