लहान मुलाच्या नाकात अडकलेली बंदूकीची गोळी, आठ वर्षानंतर लागला शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही लहान मुलांना नाकात, तोंडात वस्तू टाकण्याची सवय असते. खेळताना, मस्ती करताना आपण काय करतोय हे त्यांच्या लक्षातही येत नाही. बहुतांश मुले नाकात शेंगदाणा, वाटाणा अशा वस्तू टाकातात. या वस्तू नाकात, घशात अडकून काही वेळा जीव दगावण्याची शक्यता असते. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे.

अमेरिकेतील एका लहान मुलाच्या नाकात बंदुकीची गोळी गेली. गेल्या आठ वर्षांपासून त्याच्या नाकात ही गोळी अडकलेली होती. ज्यामुळे या मुलाला सुगंध किंवा दुर्गंधाची जाणीव होत नव्हती. एक दिवस त्याच्या नाकातून सतत दुर्गंधीयुक्त चिकट द्रव वाहू लागला. तेव्हा त्याच्या पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून स्प्रे आणि अँण्टीहिस्टामिन औषधे देऊन चार आठवड्यांनी पुन्हा तपासणीकरिता बोलावले, मात्र त्याच्या पालकांनी त्याला पुन्हा उपचाराकरिता डॉक्टरांकडे नेले नाही.

त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्याच्या नाकातून तशाच प्रकारचा चिकट दुर्गंधीयुक्त द्रव वाहू लागला. त्या द्रवाच्या घाणेरड्या वासाने संपूर्ण खोली भरून जायची. दररोज होणाऱ्या या त्रासामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला तपासणीकरिता रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याच्या नाकाचे सीटी स्कॅन करून शस्त्रक्रिया केली. तेव्हा या लहान मुलाच्या नाकातून धातूची अडकली गोळी काढण्यात आली.

जेव्हा हा मुलगा आठ, नऊ वर्षांचा होता तेव्हा त्याला बंदूकीची गोळी लागली होती, मात्र त्या वेळी त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. म्हणून त्याच्या कुटुंबियांनी त्याला डॉक्टरांकडे नेले नाही, अशी माहिती डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांकडे चौकशी केली तेव्हा दिली.