पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी वाढतेय; दूषित पाण्यामुळे साथीचे आजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात जलपर्णी वाढत आहेत. या जलपर्णीमुळे नदीपात्रातील पाणी दूषित होऊन साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. आता मोठा पाऊस झाल्यानंतरच ही जलपर्णी वाहून जाऊ शकते. मात्र, मोठा पाऊस नसल्याने जलपर्णी शिरोळ व तेरवाड बंधाऱयात साचून राहिली आहे.

पावसाळा सोडला, तर पंचगंगा नदी कायमस्करूपी जलपर्णीने व्यापलेली असते. पंचगंगा नदीकाठावरील आणि शिरोळ तालुक्यातील शिरदकाड, अब्दुललाट, हेरकाड, तेरकाड, शिरढोण, टाकवडे, कुरुंदवाड, नांदणी, धरणगुत्ती, शिरोळ या गावांना जलपर्णीमुळे दूषित पाण्याचा सामना करावा लागतो. इचलकरंजी येथून येणाऱया दूषित पाण्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन जलचर प्राणी मरतात. अशातच जलपर्णीच्या किळख्याने पंचगंगेतील पाण्याला उग्र कास येत आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते.

आमदार, खासदार, मंत्र्यांनी अनेकवेळा पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी घोषणा केल्या. तसेच अनेक वेळा मुंबई येथे मंत्रालयात बैठकाही झाल्या. मात्र, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आजपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुकात झालेली नाही. हे सर्क किषय कागदाकरच राहत असल्याने पंचगंगा नदीला गटारगंगेचे स्करूप आल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

आता मोठय़ा पावसाची गरज

सध्या पावसाळा सुरू झाल्याने जलपर्णी पुन्हा एकदा हिरवीगार झाली आहे. त्यामुळे आता मोठा पाऊस येऊन पंचगंगा दुथडी भरून वाहिल्याशिवाय जलपर्णी वाहून जाणे शक्य नाही. याबाबत प्रशासनही कोणतीही पावले उचलताना दिसून येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.