
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला सर्व स्तरातून जोरदार पाठिंबा मिळतोय. अणुशक्तीनगरमध्ये शिंदे गटाला खिंडार पडले असून वॉर्ड क्र. 145 मधील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वॉर्ड क्र. 145 मधील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वॉर्ड क्र. 145 मधील उमेदवार अशोक घुले, शाखाप्रमुख मनोहर नायडू, मीना शिंपी, विधानसभा समन्वयक साहिल शेख आदी उपस्थित होते. शिंदे गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपविभागप्रमुख रघुवेंद्र शिवगवामी, शाखाप्रमुख सर्वाना पडायची, कार्यालय प्रमुख जितेश शुक्ला, उपशाखाप्रमुख जय शंकर, कांतिक पडायची, सुनेश कांबळे, जगन्नाथन पेरुमल, गौतम लांडगे, जितू येळिगेटी, चंद्रशेखर सिंगम, कादर बाशा, इस्माईल शेख, चिराग मायेन, राजा पिल्लई, कुमार काटयुमी, गटप्रमुख बशीर पठाण, अयुब पठाण, अफसर पठाण, बशीर खान, जॉन फ्रान्सिस, गोपाल राव, अजय गणेश, रितेश, मधू मोटियन, सुनेश, जगदीश कोळी, चिन्ना राजा, रझा खान, आझम आलम सय्यद, दीपक पडायची, अरुल पडायची, गणेश अरुमडुडियार, दिनेश अरुमडुडियार आदींचा समावेश आहे.





























































