
सामना प्रतिनिधी । मुंबई
मेट्रो रेल्वेसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडून तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी गोरेगाव येथे घडली. शितल किरण मिश्रा असे या चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉलजवळ मेट्रोचे काम सुरु असून यासाठी खड्डा खणण्यात आला आहे. या खड्डय़ाभोवती बॅरीकेटस लावण्यात आले असले तरी जवळ जाण्यासाठी मोकळी जागा आहे. याठिकाणी जवळच राहणारी तीन वर्षाची शितल घरच्यांना चॉकलेट आणायला जाते असे सांगून गेली ती परतलीच नाही. बराच उशीर शितल न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली त्यावेळी ती खड्डय़ात पडलेली आढळली. खड्डय़ात पावसामुळे पाणी साचले होते. खड्डय़ाजवळ उभे राहून पाण्यात वाकून बघताना शितलचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. घरच्यांनी तिला तत्काळ रूग्णालयात नेले पण नाका-तोंडावाटे पाणी गेल्याने तिचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
नॅशनल पार्पमध्ये तरुण बुडाला
नॅशनल पार्पमधील विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या नदीत पोहण्यासाठी उतरलेला अयाज शेख (२०) हा बुडाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. बोरीवलीच्या कार्टर रोड परिसरात राहणारा अयाज भावासोबत फिरण्यासाठी नॅशल पार्पमध्ये गेला होता. फारसे पोहता येत नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले.‘



























































