
सामना प्रतिनिधी, परळी
शहरातील परळी अंबाजोगाई रोडवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर इसमाच्या डोक्यावर जखम असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही.
या घटनेची माहिती भेटताच परळी शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या इसमाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे मात्र समजू शकले नाही. मात्र रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत.




























































