आधार कार्ड हरवलं? मग अशा पद्धतीने रोखा गैरवापर

सध्या सगळ्या आवश्यक शासकीय कागदपत्रांमध्ये आधार कार्ड महत्त्वाचं असतं. मात्र, हे आधार कार्ड हरवलं तर त्याचा गैरवापरही होऊ शकतो. आधार कार्डाचा गैरवापर होऊ नये यासाठी ते लॉक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आधार कार्ड ज्या संकेतस्थळाशी जोडलेलं आहे, त्या UIDAI येथे जाऊन तुम्ही कार्डाला लॉक करू शकता. एकदा कार्ड लॉक झालं तर तुमच्या माहितीचा गैरवापर कुणीही करू शकणार नाही.

काय आहे प्रक्रिया-

1. UIDAI चे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या https://resident.uidai.gov.in/ येथे जा.
2. तेथे असलेल्या ‘My Aadhaar’ नावाच्या पर्यायामध्ये ‘Aadhaar Services’ नावाचा पर्याय दिसेल.
3. Aadhaar Services’ च्या थोडं खालच्या बाजूला Lock/Unlock Biometrics असा पर्याय दाखवलेला असेल.
4. तेथील बॉक्समध्ये टिक करून खालील Lock/Unlock Biometrics च्या टॅबला क्लिक करा.
5. त्यानंतर तुम्हाला log in चा पर्याय दिसेल. तिथे 12 अंकी आधार क्रमांक किंवा 15 अंकी व्हर्चुअल आयडी टाकावा लागेल. य
6. तेथे खाली येणारा कॅप्चा कोड भरा आोणि ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा.
7. तुमच्या लिंक फोन क्रमांकावर आलेला ओटीपी टाका आणि त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिय डेटाला लॉक करण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
9. लॉक करण्याचा पर्याय निवडल्यावर तुमचं आधार कार्ड ब्लॉक होईल.

ही प्रक्रिया पार पाडत असताना लॉक हा पर्याय स्वीकारण्यापूर्वी न विसरता 16 अंक व्हर्चुअल आयडी तेथील पर्यायावरून तयार करा. कारण, आधार क्रमांक लॉक झाल्याने त्याच्याशी संबंधित KYC किंवा अन्य कोणत्याही कागदपत्रासाठी तुम्हाला त्याचा वापर करता येईल. जसं कार्ड लॉक करता येतं, त्याच प्रक्रियेने ते अनलॉकही करता येऊ शकतं.

आपली प्रतिक्रिया द्या