लोअर परळ उड्डाणपुलाला होणाऱया विलंबाची कारणे आता रेल्वेनेच लोकांसमोर मांडावीत, आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळ आणि वरळीला जोडणाऱया लोअर परळ पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील पुलाच्या कामाला होणारा विलंब आणि त्याला गती देण्यासाठी मी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मात्र रेल्वेमंत्र्यांनी अद्यापही माझ्या पत्राला उत्तर दिलेले नाही. कामाबाबत बैठका होऊनही रेल्वे त्यांच्या हद्दीतील पूल कधी पूर्ण करेल याबाबत ठाम नाही. रेल्वेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई महापालिकेला पुढचे काम करता येणार नाही. त्यामुळे लोअर परळ उड्डाणपुलाला होणाऱया विलंबाची कारणे आता रेल्वेनेच लोकांसमोर मांडावीत, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

लोअर परळ पुलावर पश्चिम रेल्वेकडून रेल्वे मार्गिकेवर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे, मात्र या कामाला होत असलेला विलंबाबाबत स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून रेल्वेमंत्र्यांकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले, रेल्वेकडून आता 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत काम पूर्ण करण्याची वेळ कळवली आहे, मात्र रेल्वे प्रशासनाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेला पुढील काम हाती घेता येणे शक्य नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या तांत्रिक कारणाने रेल्वेच्या कामांना विलंब होतो आहे ते रेल्वे प्रशासनाने लोकांसमोर मांडावे. महापालिकेच्या वतीने हाती घेतलेल्या पोहोच रस्त्यांसाठी आतापर्यंत आवश्यक काम गतीने करण्यात आले आहे. मात्र रेल्वेने गर्डरचे बांधकाम पूर्ण केले तर महापालिकेचे उर्वरित कामदेखील तातडीने पूर्ण होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी आमदार सुनील शिंदे, अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू, शिवसेना उपनेते सचिन अहिर, स्नेहल आंबेकर, आशीष चेंबूरकर, उपआयुक्त उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पंपिंग स्टेशन व भूमिगत जलधारण टाकी यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास मदत होत आहे. मिलन सब वे आणि इतर सखल भागांचाही अभ्यास करून अशा प्रकारची उपाययोजना करण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पुढच्या आठवडय़ापासून पाहणी करणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी श्रद्धा जाधव, उपआयुक्त उल्हास महाले, प्रमुख अभियंता अशोक मेस्त्र्ााr, उपप्रमुख अभियंता प्रकाश सावर्डेकर, उर्मिला पांचाळ आदी उपस्थित होते.

हिंदमातामध्ये अतिवृष्टीतही पाणी साचणार नाही

हिंदमाता परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचते. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने सेंट झेवियर्स मैदानात भूमिगत जलधारण टाकीचे बांधकाम हाती घेतले असून हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. या टाकीमध्ये 2 कोटी 87 लाख लिटर पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे हिंदमाता परिसराला पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येतून मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळेल. भूमिगत टाक्यांची ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

पालिका बांधणार 600 मीटरचे तीन जोड उड्डाणपूल

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पूल जुना झाल्याने हा पूल रेल्वेने तोडला आहे. त्याचे 85 मीटर लांबीचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेने रेल्वेला निधी दिला आहे तसेच या पुलावर ना. म. जोशी मार्गावरून येणारे दोन आणि गणपतराव कदम मार्गावरून येणारा एक असे तिन्ही मिळून एकूण 600 मीटर लांबीचे तीन पोहोच रस्त्यांचे (जोड उड्डाणपूल) बांधकाम महापालिका करणार आहे.

मिलन सब वेसह सखल भागांमध्येही भूमिगत टाक्या

हिंदमाता परिसरातील भूमिगत टाक्यांप्रमाणे मुंबई महापालिकेकडून दादरमध्ये प्रमोद महाजन उद्यानातही भूमिगत जलधारण टाकी बांधली जात आहे.