
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात आहेत.

शिवसेना शाखा क्र. २०४ च्या वतीने आज काळाचौकी येथे ‘वृक्षारोपण कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक किरण तावडे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या उपक्रमात शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवडी विधानसभा महिला प्रमुख गौरी चौधरी, महिला पदाधिकारी रुपाली चांदे, सीमा संसारे व समीक्षा संसारे आदी उपस्थित होते.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार महेश सावंत, नगरसेवक साईनाथ दुर्गे, यशवंत विचले, सिद्धार्थ चव्हाण, प्रवीण नरे, संजय भगत, रविकांत पडयाची, आरती किनरे, रेखा देवकर, नीता राऊल, रीमा पारकर, संतोष देवरुखकर व शाळेचे मुख्याध्यापक दीपक वेखंडे उपस्थित होते.

जोगेश्वरी प्रभाग क्रमांक ७७ येथील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणाऱ्या वह्यांचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी नगरसेविका शिवानी परब, महिला शाखा समन्वयक रिटा राघवा, कार्यालयप्रमुख अविनाश रासम, युवासेना समन्वयक अभिषेक पाटील, युवासेना सरचिटणीस सुयश साटम, हिमांशू परब, अमोल भिंगार्डे, साईल गायकवाड आदी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. २२२ च्या वतीने महापालिका सफाई कामगारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. नगरसेवक व उपविभागप्रमुख संपत ठाकूर व युवासेना उपसचिव पायल ठाकूर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, युगंधरा साळेकर, सरिता तांबट, मंगेश सावंत, माधुरी पेंढारी, मेघा चौधरी, दीपाली विरदीकर, रुपेश बोम्बले, राजेश आवसरे, अशोक मोरे, सूर्यकांत गिझे व राजेश पालांडे उपस्थित होते.

शिवसेना कामोठे शहर शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपमहानगरप्रमुख प्रभाकर गोवारी, शहरप्रमुख रामदास गोवारी, सुनील गोवारी, नगरसेविका रितिक्षा गोवारी, उपशहरप्रमुख विजय गोवारी, एकनाथ गोवारी, शाखाप्रमुख विलास कामोटकर, महाराष्ट्र वाहतूक सेना सरचिटणीस गणेश खांडगे, उपशहर संघटक रुपाली खांडगे आदी उपस्थित होते.

दादर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळ आणि शिव सह्याद्री सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने अलिबागच्या मांडवा समुद्रकिनारी वृक्षारोपण करण्यात आले. इस प्रसंगी व्यापारी मंडळाचे मनोज पुंडे, अविराज पवार, अजय कोसाले, मच्छिंद्र शेलार, किशोर भगत, रामदास भोसले, तुषार भोसले, शिव सह्याद्रीचे योगेश बागल, अमोल माळी, समाधान जगदाळे, मंगेश बोरकर, दीपक अनपट, संदीप जगताप, किरण माने, संतोष शेंडकर, तानाजी थोपटे, योगेश शेंडकर उपस्थित होते.


























































