
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आले आहे. रविवारी सकाळी हे खातेवाटप जाहीर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासह सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती देण्यात आली आहेत. तर युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत.
खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशा संवाद साधला. ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी खुप काम करू. जी खाती वाटप केली आहे त्यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. इको पर्यटन, आरोग्य पर्यटन करण्याची इच्छा आहे. सगळ्यांना सोबत घेऊन काम करत राहणार’, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, राज्यपाल कोश्यारी यांनी दिली मान्यता





























































