डबेवाले भक्ती आणि शक्तीचे प्रतीक; आदित्य ठाकरे यांचे गौरवोद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम डबेवाले न थकता, अखंडपणे करीत असून मुंबईकरांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मुंबई कधी थांबत नाही आणि मुंबई चालवणाऱयांमध्ये डबेवाल्यांचा समावेश आहे. कोरोना काळातही विविध प्रकारे त्यांनी मुंबईकरांची सेवा केली असून मुंबईचे डबेवाले हे शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहेत, अशा शब्दांत पर्यावरणमंत्री आणि उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी डबेवाल्यांचा गौरव केला.

वांद्रे येथे मुंबई महापालिकेच्यावतीने 286.27 चौरस मीटरवर उभारण्यात आलेल्या डबेवाला भवनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, डबेवाल्यांचे काwतुक अनेकांनी केले. मात्र, हाच डबेवाला आल्यावर त्याने घरी परत आणलेल्या डब्यामधील तीन चपात्या वाटून खाणाया घरातील एक व्यक्ती महापौर झाल्या आणि त्यांच्या हस्ते या डबेवाल्या भवनाची फित कापली गेली हा जुळून आलेला एक योगायोग आहे. डबेवाला भवनचे उद्घाटन आज एका सच्चा मुंबईकराच्या हस्ते झाले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी डबेवाल्यांबद्दल स्वतःच्या आठवणी सांगितल्या. डबेवाल्यांसाठी स्वतंत्र भवन असावे, असा प्रस्ताव आल्यानंतर त्याला तातडीने मंजुरी दिली, असे महापौर म्हणाल्या. दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पीय भाषणात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी डबेवाला भवनाची घोषणा केली होती. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकादरम्यान सोपान मरे यांनी डबेवाला संघटनेची माहिती दिली.

n मुंबई महानगरपालिकेने शेरली, वांद्रे व्हिलेज, वांद्रे (पश्चिम) येथील समाज कल्याण पेंद्राची 286.27 चौरस मीटरची जागा मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनला दिली आहे. n डबेवाल्यांच्या प्रतिकृतीचे शिल्पकार नीरज गुप्ता, लॉकडाऊनमध्ये अन्नधान्य पुरवणाऱया युनायटेड वे चे उपाध्यक्ष अनिल परमार, मानधन न घेता सेवा देणारे डबेवाले संघटनेचे कायदेशीर सल्लागार रमेश मोरे, मार्गदर्शक सचिन शिवेकर यांचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. n डबेवाल्यांचे 5 हजारांपेक्षा जास्त सभासद असून डबेवाल्यांची ही चौथी पिढी आहे. सुमारे दीड लाख मुंबईकरांना डबे पोहोचवले जातात.

डबेवाले घरोघरी व्हिटामिन पोहोचवतात

मुंबकरांची जीवनवाहिनी म्हणून बेस्ट आणि रेल्वे यांची ओळख आहे. बेस्ट आणि रेल्वे या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत. मला त्याचा अभिमान आहे. माणसाला जिवंत ठेवणारी जी व्हिटामिन्स लागतात ते हे डबेवाले पोहोचवतात. कोरोनाला रोखणार्या मुंबई महापालिकेचे जगाने काwतुक केले त्याच मुंबई पालिकेने हे भवनही उभारले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मेट्रो कारशेडबाबत योग्य निर्णय घेऊ
मेट्रो कारशेडबाबत योग्य तो निर्णय घेऊ. मुंबईत बदल जाणवतोय. रात्रीदेखील बेस्टच्या बस धावणार आहेत. महिलांसाठीदेखील नवीन सेवा उपलब्ध करणार आहोत. बेस्टच्या 900 डबल डेकर बसही धावणार आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

वचने पूर्ण केली म्हणून आम्ही सत्तेत
शिवसेनेने गेल्या 25 वर्षांत दिलेली वचने पूर्ण केली. म्हणून 25 वर्षे आम्ही सत्तेत आहोत. रस्ते, फुटपाथ, पर्जन्य जलवाहिन्या, नाले, मिठी नदी इत्यादी सर्वच कामे केली आणि करत आहोत. मुंबईला पुढे कसे न्यायचे त्याचा विचार करताना ‘डबेवाला भवन’ उभारणे एक महत्त्वाचे काम होते आणि ते वचन आज पूर्ण केले, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.