आदित्य ठाकरे यांच्या उद्यापासून कोकणात खळा बैठका

शिवसेनेच्या उद्यापासून कोकणात खळा बैठका सुरू होत आहेत. कोकणातील घरासमोरील अंगणाला खळा असे म्हटले जाते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे गुरुवारपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर असून कोकणवासीयांशी ते खळय़ामध्ये बसून संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे गुरुवार, 23 नोव्हेंबर आणि शुक्रवार, 24 नोव्हेंबर असे दोन दिवस कोकणातील खळा बैठकांना उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकांमध्ये ते कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

गुरुवारी सकाळी 11 वाजता दोडामार्ग येथे लीना कुबल यांचे घर, दुपारी 12.25 वाजता सावंतवाडी येथे चंद्रकांत कासार यांचे घर तर दुपारी दीड वाजता कुडाळ येथे मंदार शिरसाट यांच्या घराच्या खळय़ात बैठक होणार आहे.

शुक्रवारी दुपारी दीड वाजता कुडाळ बांबार्डे येथे स्नेहा दळवी यांच्या घराच्या खळय़ामध्ये आदित्य ठाकरे हे सर्वांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत आणि सायंकाळी 4 वाजता कणकवली येथून राजापूरला प्रयाण करणार आहेत, असे युवासेनेकडून कळवण्यात आले आहे.