कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांच्या राज्यात मुंबईची लूट सुरू आहे, आदित्य ठाकरे यांचे टिकास्त्र

मुंबईतील रुग्णालयांची स्थिती सध्या भयंकर आहे, कॉन्ट्रॅक्टर मंत्री (CM) हे त्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी मुंबई लूटत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ट्विटरवरून आदित्य ठाकरे यांनी पालिका रुग्णालयातील हलगर्जी कारभारावरून मिंधे भाजप सरकारवर निशाणा साधला.

आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयश, रिक्त पदांमुळे  कर्मचाऱ्यांवर येणारा ताण व पालिकेच्या कारभारात बेकायदा मिंधे सरकारची होणारी ढवळाढवळ यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. “महापालिका रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी लोकांची सेवा करत आहेत. पण पालिका प्रशासन व राज्यातील बेकायदेशीर सरकार मात्र त्यांना योग्य तो पाठिंबा देत नाहीए. त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांच्या अपयशामुळे वैद्यकीय यंत्रणा कोलमडली आहे’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.