
आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. पण ते आज रत्नागिरीत आले असताना त्यांच्या ताफ्यात खासगी गाडय़ा आढळून आल्या. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत काही गडबड झाल्याची चर्चा रंगली. त्यावर शहर पोलीस निरिक्षक विनीत चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले. आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सर्व यंत्रणा देण्यात आली होती; परंतु त्यांचे सुरक्षा रक्षक मुंबईतून आणलेल्या इनोव्हातूनच पुढे आले. मात्र त्यानंतर संगमेश्वरपासून पुढे त्यांनी पोलिसांनी दिलेल्या वाहनांचा उपयोग केला, असे चौधरी यांनी सांगितले.
माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिकच पुरेसे
सुरक्षा व्यवस्थेसंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे; पण माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिकच पुरेसे आहेत.
































































