
सामना प्रतिनिधी । मालवण
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना व डायरेक्ट शूटिंग बॉल असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी यात्रोत्सवानिमित्त आयोजित निमंत्रितांच्या शूटिंग बॉल स्पर्धेत आयएससी मालेगाव संघाने विजेतेपद पटकावले. 25 हजार रुपये रोख व खासदार चषक देऊन विजेत्या मालेगाव संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. कै आप्पाजी आंगणे मैदानावर संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शुटीग वॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय कदम, जि प सदस्य नागेद्र परब, संजय पडते, महिला जिल्हासंघटक जान्वी सावंत, महेश परूळेकर, सुरेद्र सकपाळ, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबा आंगणे, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, पराग खोत, शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, उदयोगपती एम जी शिरोडकर, सुभाष तळवडेकर, पंकज वर्दम, राजु राठोड, सुशांत नाईक, विजय पालव, नर वालावलकर, मसुरचे उदयोजक श्री दिपक सावंत, अमित भोगले, संदेश तळगावकर, किसन मांजरेकर व अन्य उपस्थित होते.
16 संघानी स्पर्धेत सहभाग नोंदवला. पंच म्हणून जावेद मनोरे, विजय कोकीळ, सुरेश गवंडे उपस्थित होते. समालोचन प्रा. महेश परूळेकर, विनोद शिरोडकर, हर्षवर्धन कदम, दर्पण कदम, दिगंबर अणावकर, सौरभ साटम, मयुर सावंत, बावल कुडाळकर आणि शशि गंवडे यांनी काम पाहिले. सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शुटीग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पंजाब संघास मिळाले. रोख 20 हजार रुपये आणि चषक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तृतीय कमांकाचे पारितोषिक खुशीत मालेगाव संघाला मिळाले. रोख 12 रुपये आणि चषक असा पुरस्कार आहे. तर चतुर्थ पारितोषिक इस्तियाक मालेगाव संघ,पाचवा क्रमांक उदयनराजे प्रतिष्ठान सातारा संघ, सहावा क्रमांक सांगली संघ, सातवा क्रमांक संजय भोसले प्रतिष्ठान माळशिरस संघ, आठवा क्रमांक इक्कवाल मालेगाव संघाला जाहीर झाले. तसेच बेस्ट शुटर आय एस सी मालेगाव संघाचा वकार ठरला. बेस्ट नेटमन पंजाब संघाचा वुशदिपला मिळाला. तर बेस्ट लिप्टर पंजाब संघाच्या पमूला जाहीर झाला. त्यांना चषक देऊन गौरवण्यात आले.































































