आजऱयात मुलानेच केला वडिलांचा खून, हल्ल्यात आईही गंभीर जखमी, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने वडिलांचा खून करून आईलाही गंभीर जखमी केल्याची घटना आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे शुक्रवारी रात्री घडली. याबाबत आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कृष्णा बाबू गोरुले (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला असून, पारूबाई बाबू गोरुले गंभीर जखमी आहेत. सचिन गोरुले याला अटक करण्यात आली आहे.

सचिन घटस्फोटित असून, तो कागल एमआयडीसीमध्ये काम करीत होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. बहिरेवाडी गावात लक्ष्मी मातेची यात्रा चालू होती. शुक्रवारी देवीचा जागर होता. मानसिक संतुलन बिघडल्याने आई-वडिलांशी भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात प्रथम आईवर व नंतर वडिलांवर हल्ला केला. यात वडील जागीच गतप्राण झाले, तर आई गंभीर जखमी झाली. जखमी आईला प्रथम गडहिंग्लज व नंतर कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान याबाबतची माहिती मिळताच, आजरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर सचिन घराचा दरवाजा बंद करून झोपला होता. आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व सहकाऱयांनी दरवाजा तोडून सचिनला ताब्यात घेतले.