आमीरच्या ‘सितारे जमीन पर’ने कमावले 50 कोटी

आमीर खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र आहे. या सिनेमाने अवघ्या दोनच दिवसांत जगभरात 50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दिव्या निधी शर्मा यांनी लिहिलेला हा सिनेमा 20 जून रोजी जगभरात प्रदर्शित झाला. आर एस प्रसन्ना यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेड ट्रेकिंग वेबसाईट सॅकनिकने दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाने देशभरात दोन दिवसांत 30.9 कोटी रुपये कमावले. सिनेमाची कथा हटके असून अतिशय भावनाप्रधान आहे. त्यामुळे या सिनेमाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. सिनेमात आमीरने बास्केटबॉल कोचची भूमिका साकारली असून जेनेलिया डिसोझादेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.