आपचे खासदार राघव चढ्ढा निलंबित

aap-mp-raghav-chadha

कायद्याचे उल्लंघन, गैरवर्तन, बेपर्वाई आणि उद्धट वर्तनाचा ठपका ठेवून आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले.  चढ्ढा यांनी दिल्ली विधेयक विशेष समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर काही सदस्यांची नावे त्यांच्या अनुमतीशिवाय अंतर्भूत केली होती, असे निलंबनाचा प्रस्ताव मांडताना सभागृह नेते पियूष गोयल यांनी सांगितले. भाजपचे तीन खासदार, बिजू जनता दल आणि एआयएडीएमकेच्या एका खासदाराचा यात समावेश आहे.